Rajarshi Shahu Maharaj Scholarship उच्च शिक्षणासाठी वर्षाला दहा हजार !


 उच्च शिक्षणासाठी वर्षाला दहा हजार !

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्ख शिष्यवृत्ती योजना. : २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षणास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या सामाजिक आणि न्याय व विशेष साहाय्य या विभागातर्फे  १० हजार रुपयांची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती हि दिली जाते. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह १२ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा समाजकल्याण आयुक्तालयाकडे अर्ज हे करावयाचे आहेत.

राजर्षी शाहू महाराज scholarship

काय आहे राजरश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती  योजना आणि त्याच्या अटी.

राज्य सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य आणि विशेष साहाय्य या विभागाच्या वतीने दार वर्षी १०० विद्यार्थ्यांना एम्स, आयआयएम, आयआयटी, एनआयटी, आयआयएससी, आयसर आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था, महाविद्यालये तसेच इतर मान्य संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ हा aदेण्यात येतो.

( प्रोत्साहन अनुदान यादी येथे पहा  )

योजनेसाठी उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे

■ विद्याथ्यांच्या कुटुंबाचे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात उत्पन्न ६ लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. 

■ पालक नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र त्यासाठी फॉर्म नं. १६ प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक राहील.

■ विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौद्ध सहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

■ अर्ज करताना विद्यार्थ्यांनि पदवी अभ्यासक्रमासाठी  राज्य सरकारच्या किंवा इतर राज्यांच्या/केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ हा घेतलेला नसावा.

■ प्रवेश घेणारा विद्यार्थी हा मान्य विद्यापीठ / संस्थामध्ये पूर्णवेळ विद्यार्थी असावा.

■  २५ वर्षे पदवी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा आणि पदव्युत्तर पदवी/पदविकासाठीची वयोमर्यादा हि 30 वर्षे राहील.

प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये 


योजनेस पात्र विध्यार्थ्यांना त्याच्या पुस्तकांसाठी ५ हजार व काही साहित्य इतर खर्चासाठी ५ हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये प्रत्येक वर्षी संबंधित विध्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दोन टप्यात हे देण्यात देण्यात येतील.

या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह १२ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा समाजकल्याण आयुक्तालयाकडे अर्ज हे करावयाचे आहेत.

१२ ऑक्टोबरपर्यंत मुदत.

२०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जातीच्या (नवबौद्धासहित) विद्यार्थ्यांकडून १२ ओक्टोम्बर सायंकाळी  ६.१५ पर्यंत अर्ज हे मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अश्या विद्यार्थ्यांची  त्या  वर्षांची शिष्यवृत्ती हि मिळणार नाही.  परंतु त्यानंतर जर विध्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिष्यवृत्ती हि त्यास मिळेल. जर विद्यार्थी हा दोन वेळा अनुत्तीर्ण झाल्यास त्या पुढील शिष्यवृत्ती हि मिळणार नाही.

Post a Comment

0 Comments

Ad Code