Farmer Registry Agri Stack - फार्मर आयडी: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
फार्मर आयडी (Shetkari ID) म्हणजेच शेतकरी ओळखपत्र, हे सर्व शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. या आयडीचा उपयोग विविध सरकारी योजनांमध्ये ओळख सिध्द करण्यासाठी केला जातो. फार्मर आयडी काढल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील. यामध्ये प्रमुख फायदे म्हणजे शेतकऱ्यांची माहिती एकत्र केली जाणे, पीक कर्ज, पीएम किसान योजनेचा लाभ, तसेच पीक विमा बाबतची सुविधा यांचा समावेश आहे. चला, तर मग जाणून घेऊया फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया.
Farmer ID फार्मर आयडी काढण्याचे फायदे
फार्मर आयडी काढल्याने शेतकऱ्यांना खालील फायदे मिळतात Farmer Registry Agri Stack -:
- शेतकऱ्यांची माहिती एकत्र केली जाते - शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये संग्रहित केली जाते.
- पीएम किसान योजनेचा लाभ - पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
- पीक कर्जासाठी - बँकेतून पीक कर्ज घेतांना फार्मर आयडी अनिवार्य आहे.
- पीक विमा - पीक विमा भरताना फार्मर आयडी आवश्यक आहे.
फार्मर आयडी कसा काढावा?
१. वेबसाइटवर लॉगिन करा
फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांना MHFR जीवन या वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवरील लॉगिन विथ सीएससी या पर्यायावर क्लिक करा.
२. आधार ओथेंटिकेशन
आधार ओथेंटिकेशन करण्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत:
- ओटीपी - आधार कार्डशी संबंधित मोबाईल नंबरवर OTP येईल, जो तुम्हाला टाकावा लागेल.
- बायोमेट्रिक थंब डिवाइस - यामध्ये तुम्हाला अंगठा ठेऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
आधार नंबर टाकून ओटीपी किंवा बायोमेट्रिक वापरून व्हेरिफाय करा.
३. शेतकऱ्याची माहिती भराः
शेतकऱ्याच्या कस्टम डिटेल्स भरताना त्याचे नाव, लिंग, कास्ट कॅटेगरी, जन्मतारीख इत्यादी तपशील भरावे लागतात. कास्ट सर्टिफिकेट नंबर आवश्यक असल्यास, तो टाकावा लागेल.
४. रेसिडेन्शियल डिटेल्स भराव्यात
तुमच्या आधार कार्डवरील पत्त्याची माहिती तपासा आणि आवश्यकतेनुसार तालुका, जिल्हा, आणि गावाची माहिती भरा. काही वेळा सर्वरच्या प्रॉब्लेममुळे गावाचा नाव दिसत नाही, तर इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंशियल डिटेल्स वर क्लिक करून ते भरू शकता.
५. शेत जमिनीचे तपशील भरा
शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे तपशील आणि गट नंबर भरून, फेच लँड डिटेल्स वर क्लिक करा. यामध्ये जिल्हा, तालुका आणि शेतकऱ्याच्या गट नंबरची माहिती आवश्यक आहे.
६. माहिती तपासा आणि सबमिट करा
सर्व माहिती तपासून आणि योग्य असल्याची खात्री करून सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर, तुम्हाला व्हेरिफाय ऑल लँड वर क्लिक करून माहितीच्या सत्यतेची पुष्टी करायची आहे.
७. डिक्लरेशन आणि अंतिम सबमिशन
सर्व डिटेल्स तपासल्यानंतर, डिक्लरेशन स्वीकारा आणि सेव्ह अॅज अ ड्राफ्ट हा पर्याय निवडा. त्यानंतर सेव्ह या पर्यायावर क्लिक करा. एकदा तुमची माहिती 100% पूर्ण झाली की, ओटीपी किंवा बायोमेट्रिक वापरून ई-साइन करा.
८. अंतिम नोंदणी आणि स्टेटस
ई-साइन केल्यानंतर, तुमच्या रजिस्ट्रेशनची पुष्टी होईल आणि तुम्हाला एनरोलमेंट आयडी दिले जाईल. हे आयडी तुमच्या फार्मर आयडी कार्डशी संबंधित असेल.
स्टेटस तपासणे
तुम्ही जेव्हा फार्मर आयडीसाठी नोंदणी पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला पेंडिंग स्टेटस दिसेल. काही दिवसांनंतर, तुम्हाला ते अप्रूव झालं दिसेल. त्यानंतर फार्मर आयडी जनरेट होईल.
conclusion
फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळवणे सोपे होईल. हा लेख आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद!
जय हिंद, जय महाराष्ट्र!