मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात गेले? असं तपासा!

"मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण" योजनेचे चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे 3 हजार रुपये हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही पात्र महिलांना बँक खात्यात हे पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही. तसंच, अर्जात ज्या खात्याची नोंद हि केली आहे, त्या बँकेत जाऊन तपासले असता त्या खात्यातही पैसे हे आलेले नाहीत, अशी स्थिती हि तुमचीही झाली असेल तर तुमचे पैसे हे कोणत्या खात्यात गेले? आणि ते कसे तपासायाचे याविषयी सोपी ट्रिक हि तुम्हाला सांगणार आहोत.


🧐मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात गेले? असं तपासा! 

◆ सर्वात आधी https://myaadhaar.uidai.gov.in/check-aadhaar यासंकेतस्थळावर जा.

◆ त्यानंतर खाली असलेल्या My Aadhar या वर क्लिक करा.

◆ तिसऱ्या कॉलममध्ये Aadhaar Services च्या खाली बँक सिडिंग हे स्टेटसवर क्लिक करा.

◆ तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा पर्याय हा समोर दिसेल. 

◆ तिथे तुमचा आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करा, कॅप्चा भरा व आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी हा भरा.

◆ आता तुमच्या समोर चौकोनी या आकारातील काही पर्याय दिसतील. तिथे Bank Seeding Status वर क्लिक करा.

◆ तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Congratulations! हा Your Aadhaar-Bank Mapping has been done असा मेसेज येऊन खाली ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे, त्याची माहिती येईल. 

◆ तिथे आलेल्या बँकेतच तुमचे पैसे जमा झाले आहेत.


💁🏻‍♀️ लाडकी बहीण योजनेच्या अर्जात भरलेल्या बँक खात्यात तुमचे पैसे हे जमा न होता इतर खात्यात पैसे जमा झाल्यास अनेकदा मेसेज हा येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे वरील युक्ती वापरून जर आपण प्रक्रिया केलीत तर आपल्याला पैसे हे कोणत्या खात्यात गेलेत हे समजायला हि सोपं पडेल.


☎️ mukyamantri ladaki bahin helpline number हेल्पलाईन क्रमांक कोणता? 

सिडिंग बँक खात्यातही पैसे जमा झाले नसतील तर १८१ या हेल्पलईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.


Mukhyamantri mazi ladki bahin yojana 3rd installment : महाराष्ट्र शासनाच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या" तिसऱ्या हफ्त्याचे पैसे हे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. अनेक भगिनींनी या निधीची प्रतीक्षा केली आहे, आणि सरकारने आता हे निश्चित केले आहे की पैसे लवकरच ट्रान्सफर केले जातील.

ladaki bahin yojana 3 hapta
ladaki bahin yojana 3 hapta


महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी  हि "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" च्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात २९ सप्टेंबरपासून डीबीटीच्या DBT TRANSFER माध्यमातून हस्तांतरित केले जाणार आहेत, अशी माहिती हि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

आज मंत्रालया मध्ये या योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आवश्यक चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या व्यासपीठ व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा , सांस्कृतिक कार्यक्रम, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी आणि लाभार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत महत्त्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

"माझी लाडकी बहिण योजने"अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹१,५०० मिळणार आहेत. याआधी, ₹३,००० त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.

तिसरा हफ्ता २९ सप्टेंबर २०२४ पासून जमा होणार आहे.

तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे का?

ज्या महिलांचे अर्ज नाकारले गेले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. महिन्याचा शेवट जवळ आल्यानंतर, ज्यांनी त्यांच्या अर्जांचे पुनःसादरीकरण केले नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


काही महिलांचे अर्ज कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे नाकारले गेले. अर्ज नाकारला जाऊ नये म्हणून योग्य आणि संपूर्ण कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे..


योजनेसाठी च्या आवश्यक कागदपत्रांची यादी 

लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांचे फोटो अस्पष्ट असतील तर अर्ज रद्द केला जाईल. योग्य पद्धतीने कागदपत्रे अपलोड कशा कराव्यात हे शिका.

तुम्हाला पैसे का मिळत नाहीत?

बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तिसऱ्या हफ्त्याचे वितरण २९ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे.


पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तुमच्या आधार नंबरला बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, सरकारी अनुदान मिळवण्यासाठी NPCI अर्ज सादर करणे देखील महत्त्वाचे आहे.


NPCI  चा अर्ज डाउनलोड करण्यासाठी  क्लिक करा. 


कोणत्या महिलांना लाभ मिळणार?

महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे.


लाभ मिळवताना मुख्य समस्या म्हणजे बँकेला आधार किंवा NPCI लिंक नसणे. तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता.


आधार लिंक चेक करण्यासाठी येथे क्लिक करा. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना"च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


अशा पद्धतीने, लाडकी बहिण 3रा हफ्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 


----------------**********---------------

Announcement of the Third Installment - Deposit Day for Ladki Bahin


The much anticipated third installment of the "Mazi Ladki Bahin Yojana" of the Chief Minister is about to be transferred into the bank accounts of women. The government has officially verified that the money will be transferred soon, as many sisters have been wondering when these cash will be credited.

Women who qualify for the "Mazi Ladki Bahin Yojana" would earn ₹1,500 each month. Previously, their accounts had ₹3,000 placed into them.

Credit for the third installment will begin on September 29, 2024.

Why Are Your Funds Not Arriving?

The money from the Ladki Bahin Yojana has been deposited into the bank accounts of numerous women. On September 29, 2024, the third installment will start to be distributed.

You must link your bank account and Aadhaar together in order for the funds to be credited to your account. The NPCI application must also be submitted in order to be eligible for government funding.

Click on the this link to get the NPCI application.

Qualifications for Benefits
Married, widowed, divorced, abandoned, and penniless women in Maharashtra between the ages of 21 and 65 are eligible for this plan.

Lack of an Aadhaar or NPCI connection to the bank is a major obstacle to benefit receipt. From your mobile device, you can check the Aadhaar linking of your bank account.

Click this page to confirm your Aadhaar linkage. Go to the "Mazi Ladki Bahin Yojana" official website for additional details.

To sum up, qualifying women will shortly get the third installment of the Ladki Bahin Yojana in their accounts.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad