शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: पूर, सर्पदंश, वीजपडीला मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू अथवा  अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत  गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: पूर, सर्पदंश, वीजपडीला मदत

( Gopinath munde shetkari apghat vima yojana )

पुणे : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. पुणे जिल्ह्यात २७७ दाव्यांपैकी ६१ शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील सर्वच जिह्ल्यात या योजनेला सन२०२२ साठी राबविण्यास मंजुरी मिळाली आहे.

( Gopinath munde shetkari apghat vima yojana )

अपघातामुळे शेतकऱ्यांचे होणारे मृत्यू आणि येणारे अपंगत्व यामधून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना हि २००५-६ पासून चालू करण्यात आलेली आहे.

Gopinath munde shetkari apghat vima yojana

मृत्यू झाल्यास २ लाख

शेती करताना शेतकऱ्यांना अपघाती मृत्यू येतो. त्यात अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना २ लाख रुपये दिले जातात.

( Gopinath munde shetkari apghat vima yojana )

अपघातामध्ये एक अवयव गेल्यास एक लाख आणि जर एक अवयव किंवा एक शेतकऱ्याचा डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख रुपये विमा दिला जाईल.

दोन डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाख

( Gopinath munde shetkari apghat vima yojana )अपघातात जर शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागल्यास २ लाख रुपये विमा देण्यात येतो. एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास त्या शेतकयाच्या कुटुंबाला २ लाख रुपये एवढी रक्कम विम्याच्या स्वरूपात दिली जाते.


मदतीसाठी अर्ज कोठे कराल?

१० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार नसलेला अशा एकूण दोन जणांना लाभ घेता येईल. या योजनेसाठी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.

( Gopinath munde shetkari apghat vima yojana )

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दावा अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत नोंदवला, तरच शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळते.


गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :- 

➥शेतकऱ्याच्या जमिनीचा ७/१२ ( वहितीधारक नसेल तर कुटुंबातील सदस्याचा )

➥६क ची नकल 

➥६ड (फेरफार ferfar )

➥एफ. आय. आर. ( FIR COPY )

➥पंचनामा

➥पोष्ट मार्टेम रिपोर्ट

➥व्हिसेरा रिपोर्ट

➥दोषारोप

➥दावा अर्ज

➥वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक

➥घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला

➥तालुका कृषि अधिकार पत्र

➥अकस्मात मृत्यूची खबर

➥घटनास्थळ पंचनामा

➥इंनक्वेस्ट पंचनामा

➥वाहन चालविण्याचा वैध परवाना

➥अपंगत्वाचा दाखला व फोटो

➥औषधोपचारा चेकागदपत्र

➥अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

* कागदपत्रे अपघाताच्या स्वरूपानुसार वेगवेगळी असतात.२७७ प्रस्ताव, ६१ जणांचे दावे मंजूर


■ जिल्ह्यात ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत एकूण २७७ दावे दाखल करण्यात आले. त्यातील ६१ दावे मंजूर करण्यात आले असून १३ दावे फेटाळण्यात आले आहेत.


■ १६३ दावे विमा कंपनीकडे १६३ दावे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत, तर ४० दाव्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही.

- प्रमोद सावंत, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad