कुकुटपालणासाठी ५.३० लाख अनुदान. या जिल्ह्यात झाली सुरुवात.

कुकुटपालणासाठी ५.३० लाख अनुदान. या जिल्ह्यात झाली सुरुवात.


 

कुकुटपालणासाठी ५.३० लाख अनुदान. या जिल्ह्यात झाली सुरुवात.

सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना राज्यातील 302 तालुक्यामध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने सन 2021-22 साठी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांची निवड करण्यात आली आहे, यांपैकी किती काही तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.  (Intensive poultry development)या उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदान 50 टक्के दिले जाणार आहे.


भूम, परांडा, कळंब , तुळजापूर , उमरगा या पाच तालुक्यांची निवड केलेली आहे. या तालुक्यातून प्रति तालुका १ याप्रमाणे ५ लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब , तुळजापूर , उमरगा तालुक्यातील इच्छुक लाभार्थींनी त्यांचे अर्ज संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे विहित नमुन्यात दिनांक १२ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.


लाभार्थ्यांना 50 % अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये –

सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील सघन कुक्कुट विकास (Intensive poultry development) गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून सर्व प्रवर्गातीत लाभार्थ्यांना 50 % अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये मिळणार आहे. जे लाभार्थी सध्या कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत तसेच, ज्या लाभार्थ्याकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर या लाभार्थ्यांनी त्वरित योजनेचा लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments

Ad Code