केंद्रीय साहाय्य योजने अंतर्गत दुधाळ गाई व म्हशींचे गट वाटप

 केंद्रीय साहाय्य योजने अंतर्गत दुधाळ गाई व म्हशींचे गट वाटप :-


केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजने 
अंतर्गत सन २०२१ – २२ वर्षांसाठी नंदुरबार जिल्यातील 
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा कार्यक्षेत्रातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी लाभ मिळणार आहे. अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे. 
या योजनंसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे. (२०२२)

gai v mhasi che gat vatap
GOV SCHEME FOR COW AND BUFFALO




या योजनेसाठी दिव्यांग, विधवा, परितक्त्या स्त्रिया, अल्प भूधारक, महिलां यांनी १४ ते २३ जानेवारी २०२२ या कालावधीत अर्ज सादर करा.

१४ ते २३ जानेवारी या दरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

लाभार्थ्यांची निवड कशी असेल ते पाहा:

1) लाभार्थी सदस्य असलेला महिला बचत गट हा नोंदणीकृत असावा.
2) अपंग, विधवा, परितकत्या, अल्प भूधारक महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
3) ज्या योजने अंतर्गत गट स्थापन केला आहे , त्याचे बचत गट चालू असल्याचे प्रमाणपत्र 
4) लाभार्थी ही आदिवासी महिला बचत गटातील सदस्य असणे अनिवार्य राहिल.
5) लाभार्थ्याकडे तिनं २० गुंठे शेतजमीन , ओलिताची असणे आवश्यक आहे.
6) कुटुंबातील एकाच व्यक्तींना योजनेचा लाभ मिळेल.
7) लाभार्थ्याकडे  किमान ४ गायी करिता गोठ्यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे .

  

 संकरित गाय –  जर्सी म्हैस – मुऱ्हा /एच.एफ. / जाफराबादी. तसेच देशी गाय – गीर, , राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, साहिवाल, रेड सिंधी ,गवळाऊ व डांगी या जातींच्या गाई म्हशी घेता येतील .




     अनुदान लाभ कसा असेल 

1) संकरित गाईचा गट – प्रति गाय रु. ५५,०००/- प्रमाणे
१,१०,०००
2) प्रति गाय विमा रु. २,७५०/- (३ वर्षासाठी)
५,५००
3) वाहतुक खर्च प्रती लाभार्थी
४,५००
एकूण प्रकल्प किंमत
१,२०,०

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडा –

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२) रहिवासी प्रमाणपत्र
३) ८ अ उतारा
४) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र
५) आधारकार्ड
६) बँक खाते पासबुक सत्यपत्र
७) अनुसूचीत जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
८) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
९) नमुना नंबर ८
१०) लाभर्थ्याची स्वत:ची जमीन नसल्यास भाडे तत्वावर जमीन घेतले बाबतचे समती पत्र सातबारा व ८ अ उतार्‍यासह
११) सातबारा
१२) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
१३) अपत्य दाखला / स्वघोषणा पत्र
१४) दिव्यांग असल्यास दाखला
१५) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१६) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१७) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१८) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत




    ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी येथे क्लिक करा .
                                               👉👉येथे दाबा👈👈

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad