digital satbar download maharastra

 ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढायचा?  सातबारा मोबाईल क्रमांक वापरूनकसा काढायचा?

March  20, 2022

सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं  केले आहेत. सातबारा उताऱ्यात जवळपास ५०  वर्षांनंतर  बदल करण्यात आले आहेत. सामान्य जनतेला महसूल दिनापासून  हा नवीन स्वरुपातला सातबारा उतारा (१  ऑगस्ट २०२१ )  उपलब्ध करून देण्यात आला आहे.

satbara download

तुम्हाला तलाठी कार्यालयात हा सातबारा उतारा काढण्यासाठी खेटे घालण्याची आता गरज नाही.

 डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही सातबारा घरबसल्या काढू शकता आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तो सातबारा वापरताही येतो.

पण, सही डिजिटल असलेला सातबारा ,उतारा मोबाईलवर कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

डिजिटल सातबारा कसा काढायचा?

online saatbara download


डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गूगलवर येऊन www.bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचे आहे. 

satbara download maharastra

त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या  महसूल विभागाची तुमच्यासमोर  वेबसाईट ओपन होईल.

हि वेबसाईटउघडल्या नन्तर  वेबसाईटवर उजवीकडे Digitally Signed 7/12 किंवा 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा'  तुम्हाला  हा पर्याय दिसेल.

त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्यासमोर 'आपला 7/12' नावाचं एक नवीन पेज उघडेल.

online satbara maharastra

या वेबसाईटवर तुम्ही जर आधीच  नोंदणी केली असेल, तर साईटवरील लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या  सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण,  तुम्ही जर नवीन सातबारा काढण्यासाठी पहिल्यांदाच  इथं आला असेल, तर तुम्हाला मोबाईल क्रमांक वापरूनही सातबारा काढता येईल.


पण !  ते कसं करायचे तर त्यासाठी तुम्हाला OTP Based Login या पर्यायावर  क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खालच्या रकान्यात Enter Mobile Numberच्या  तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला  Send OTP या पर्यायावर क्लिक करावं लागेल  आहे.

तुम्ही एकदा का  या पर्यायावर क्लिक केलं की लगेच , OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.

याचा अर्थ असं कि तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले., ते जसेच्या तसे खालच्या रकान्यात तुम्हाला Enter OTPच्या  टाकायचे आहेत.

त्यानंतर तेथील Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

पुढे आपला सातबारा तुमच्यासमोर एक नावानं एक नवीन पेज उघडेल . या पेजवर तुम्हाला वेगवेगळे  Digitally signed 8A, 

 Digitally signed 7/12, Digitally signed Property card, Payment Status ,Recharge Account, Payment History, असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

या मधील तुम्ही  Digitally signed 7/12 या पर्यायावर  क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर  'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा' असं शीर्षक असलेलं पेज उघडेल.सगळ्यात शेवटी  यामध्ये सूचना दिलेली आहे की, "for download of every satbara Rs.15 will be charged . from available balance This amount will be deducted ."

याचा अर्थ  15 रुपये प्रत्येक सातबाऱ्यासाठी चार्ज केले जातील, ते उपलब्ध बॅलन्समधून तुमच्या  कापले जातील.

आता आपण येथे नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे  इथं काही आपल्या खात्यात बॅलन्स नसतं. त्यामुळे खात्यात पैसे जमा करणं सगळ्यात आधी  गरजेचं असतं.

ते कसे करायचे तर तुम्ही रिचार्ज अकाऊंट खाली असलेल्या  या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर हे पैसे  इंटरनेट बँकिंग,डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, किंवा भीम अँप, म्हणजेच गुगल पे,फोन पे   असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. 

तसे तेथे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

पैसे भरल्या नंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर परत गेले कि , तिथं तुम्हाला v 15 रुपये  जमा असल्याचं दिसेल.

आता सहीचा डिजिटल  सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.

यात तुमच्या  जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुम्ही  सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला डाऊनलोड झालेला डिजिटल सातबारा  स्क्रीनवर दिसेल.

यावर हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत स्पष्ट लिहिलेलं असतं की,  तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.


साताबारा कसा वाचायचा?



 सुरुवातीला सातबाऱ्यावरगाव नमुना ७  आणि खाली गाव नमुना १२  असतो.

शेतकऱ्याकडे किती जमीन आहे हे गाव नमुना सातमध्ये असते , त्याचा जमिनीवर किती  अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.

यामध्ये वरच्या कोपऱ्यात  डाव्या बाजूला गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर ही जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत  येते, ते सांगितलं असतं.

आमची भोगवटादार वर्ग- 1  जमीन या पद्धतीत येते.यात  अशा जमिनी भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये  येतात,शासनाचे निर्बंध ज्यांचं हस्तांतरण करण्यावर नसतात, या  जमिनीचा मालक हा शेतकरीच असतो.

 वर्ग-2 मधील भोगवटादार जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत,  जमिनींचं हस्तांतर सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय याहोत नाही.


यामध्ये भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी , देवस्थान इनाम जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

 'सरकारी पट्टेदार' जमिनी  चौथ्या प्रकारातयेतात. यामध्ये भाडेतत्वावर दिलेल्या पण सरकारी मालकीच्या  जमिनी असतात. या जमिनी ह्या  भाडेतत्वार 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी दिल्या जातात.

सातबारा हा तीन प्रकारात ढोबळमानानं  विभागलेला असतो. यात भोगवटादाराचं नाव,शेताचं नाव.  व क्षेत्र आणि शेवटी खाते क्रमांक असतो.

शेताला काही शेताचं नावासमोर ठरावीक नाव दिलेलं असेल, तर ते नाव इथं नमूद केलेलं असतं.

इथं  किती जमीन तुमच्याकडे आहे ते हेक्टर व आरमध्ये दिलेलं असतं. ती बागायती आहे,जिरायती आहे का ते सुद्धा येथे नमुद केलेलं असतं. एकूण क्षेत्र हे किती  सांगितलेलं असतं.  पोट खराब म्हणजेच त्याखालील लागवडीस अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते.

त्यानंतरती जमीन कुणाच्या मालकीची आहे  म्हणजे भोगवटादाराचं नाव , ते सांगितलेलं असतं. त्यासमोर या जमिनीवर किती शेतसारा म्हणजेच कर आकारलाजातो ते सांगितलं आहे.

खाते क्रमांक तिसऱ्या रकान्यात  असतो. त्यात खाते क्रमांक हा गाव नमुना आठ-असाठीचा  नमूद केलेला असतो. कर्जाचा बोजा या भागात  आहे का,विहीर असेल तर त्या विहिरी वर कुणाचा ह्क्क आहे, इ. माहितीही असते.

त्यानंतर  गाव नमुना -१२ खाली असतो. ही सातबाऱ्यावरील  पिकांची नोंदवही असते.

यात कोणत्या वर्षी तुम्ही  कोणती पीकं घेतली, किती क्षेत्रावर ती  घेतली आणि जलसिंचनाचा स्रोत त्यासाठी  काय आहे, हे इ. नमूद केलेलं असतं. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad