कांदा लागवडी विषयी संपूर्ण माहिती

 कांदा लागवडी  विषयी संपूर्ण  माहिती :-

   नमस्कार मंडळी 🙏

   शेती तुमची सहकार्य आमचे ...

  आपण आज या लेखा मध्ये कांदा लागवडी विषयीची माहिती बघणार आहोत .

( onion farming full detail information in marathi ) 

 

                                     ( onion farming full detail information in marathi )

   कांदा लागवडी विषयी संपूर्ण  माहिती मराठी मध्ये .

 ● लागवडीची वेळ   :-
       खरीप  : जुलै -ऑगस्ट 
      रांगडा : सप्टेंबर - आक्टोबर 
      रब्बी / उन्हाळी : नोव्हेम्बर -डिसेंबर

सुधारित वाणाच्या जाती :-
    खरीप : फुले समर्थ ,बसवंत ७८० , अँग्रिफाउंड डार्क रेड
    रांगडा : बसवंत ७८० , फुले समर्थ , एन -२-४-१
    उन्हाळी : एन २-४-१ , अँग्रिफाउंड लाईट रेड , अर्का निकेतन .

लागवडीचे अंतर :
    खरीप १५ ×१० से.मी.
    रांगडा १५ x१० से.मी. रब्बी / उन्हाळी : १५ - १० से.मी.

● बियाण्याचे प्रमाण किती असावे :-
    ८ ते १० किलो प्रति हेक्टर.

खतांची मात्रा किती असली पाहिजे :-
 
   १०० ५० ५० नत्र स्फुरद पालाश किलो / हेक्टर.


● अन्नद्रव्य व्यवस्थापन :-

   १ ) सेंद्रिय खते २५ ते ३० टन शेणखत / हेक्टर
   २ ) जीवाणु खते : अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणारे जीवाणु २५ ग्रॅम / किलो बियाण्यास पेरणीपुर्वी चोळावे.

● आंतरमशागत :-
   -१५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे.
   - लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी वरखताची मात्रा द्यावी.
   - कांद्याच्या अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन २३.३ टक्के ई.सी. व ० .०६८ क्रियाशिल
     घटक ७.५ मि.ली.
   - व क्युझोलफॉप ईथाईल ५ टक्के ई.सी.व ०.०२ कि. क्रियाशील घटक १० मिली या तण नाशकांची १० लिटर
    पाण्यात लागवडीनंतर २५ दिवसांनी फवारणी करून ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.


● खते देण्याची वेळ :-      (कांदा लागवडी विषयी संपूर्ण  माहिती मराठी मध्ये .)
 

       १ ) रब्बी हंगामाचा कांदा पुर्नलागवडीपुर्वी १० -१५ दिवस अगोदर गंधक हेक्टरी ४५ किलो या प्रमाणात जिप्सम
      किंवा गंधकाच्या स्वरुपात मातीत मिसळावे.
       
       २ ) सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.

       ३ ) रासायनिक खत ५० :५० :५० किलो नत्र: स्फुरद पालाश / हेक्टर लागवडीच्या वेळी द्यावी व उर्वरीत ५०
       किलो नत्र २ समान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.

    
( onion farming full detail information in marathi )

    


→ आता आपण कीड व रोगाबद्दल जाणून घेऊ:-

   ● करपा रोग :-
    याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५ ( ० .३ % ) किंवा टेब्युकोनॅझोल ( ० .१ % ) हे बुरशीनाशक १० ते १५
   दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावेत.
   ( किटकनाशक व बुरशीनाशकाचे प्रमाण १० लि. पाण्यासाठी दिले आहे.)


  ●फुलकिडे :
     प्रौढआणि पिले पाने खरडवतात. आणि त्यातून बाहेर येणारा रस शोसून घेतात . त्यामुळे पानांवर पांढरे डाग
    पडतात यालाच टाक्या असे म्हणतात .

    त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० % ईसी १५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ % ई.सी. ६ मि.ली.
    या
    किटकनाशकांच्या आलटुन पालटुन फवारण्या करावा . अधून मधून ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
    फवारणी करतांना चिकट द्रव्याचा ( ० .१ % ) वापर करावा.



  ● उत्पादन खरीप १०० ते १५० क्विंटल / हेक्टर रांगडा : २०० ते २५० क्विंटल / हेक्टर रब्बी / उन्हाळी : २५० ते
    ३५० क्विंटल / हेक्टर.





 
     तुम्हाला जर हि माहिती उपयोगी वाटत असेल . तर कृपया  हा लेख इतरांना पाठवा.

     धन्यवाद !


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad