सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत वितरित होणार

Maharashtra Govt Help To Farmers | Damage TO Crops 

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत वितरित होणार

Govt Help To Farmers


krushi news : मागच्या वर्षी साल २०२२ मध्ये पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील  पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता जवळपास  15 लाख 57 हजार 971 हेक्टर बाधित क्षेत्रामधील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत हि शासनातर्फे देण्याचा निर्णय हा या १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

GR डाउनलोड करा 👇

Creating Download Link...
 

शेतकऱ्यांना अशी मिळणार नुकसान भरपाई रक्कम.

बळीराज्याच्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मिळालेल्या प्रस्तावांबाबत या मंत्रिमंडळात निर्णय हा घेण्यात आला होता,त्यानुसार हा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर हे सुधारित केले आहेत. त्याच नुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर हे 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या क्षेत्र मर्यादेत मदत देण्यात येईल. { ativrushthi nuksan bharpayi madat }

राज्य शासन कडून अतुवृष्टी नुकसान भरपाई जाहीर.

राज्यातील खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आकडा 
➨ अहमदनगर जिल्ह्यातील २,९२,७५१ शेतकऱ्यांना सुमारे २४१ कोटी.
➨ अकोला जिल्ह्यातील १,३३,६५६ शेतकऱ्यांना ८६ कोटी ७२ लाख.
➨ अमरावती जिल्ह्यातील २,०३,१२१ शेतकऱ्यांना १२९ कोटी ५७ लाख.
➨ औरंगाबाद येथील ४,०१,४४६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ९८ लाख.
➨ बीड जिल्ह्यातील ४,३७,६८८ शेतकऱ्यांना १९५ कोटी ३ लाख.
➨ बुलढाणा जिल्ह्यातील २,३८,३२३ शेतकऱ्यांना ११४ कोटी ९० लाख.
➨ जळगाव जिल्ह्यातील ६२,८५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख.
➨ जालना जिल्ह्यातील २,१४,७९३ शेतकऱ्यांना १३४ कोटी २२ लाख.
➨ नागपूर जिल्ह्यातील ६ हजार १६१ शेतकऱ्यांना ६ कोटी २३ लाख.
➨ नाशिक जिल्ह्यातील १,१२,७४३ शेतकऱ्यांना २५ कोटी ८३ लाख.
➨ उस्मानाबाद येथील २,१६,०१३ शेतकऱ्यांना १३७ कोटी ७ लाख.
➨ परभणी जिल्ह्यातील १,८८,५१३  शेतकऱ्यांना ७० कोटी ३७ लाख.
➨ सोलापूर जिल्ह्यातील ४९,१६८ शेतकऱ्यांना ४६  कोटी ८९ लाख.
➨ वाशिम जिल्ह्यातील ६३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ३९ कोटी ९८ लाख रूपये वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय हा २० जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


आम्ही अशा करतो कि हि माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल आणि अश्याच सर्व शासकीय योजनांचे अपडेट्स आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी खालील नंबर ला मॅसेज करा. whatsapp - येथे दाबाPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad