शेतकऱ्यांचे आता सोन्याचे दिवस

 शेतकऱ्यांचे आता सोन्याचे दिवस;अतिवृष्टीने पीक नष्ट झालं तरी मिळणार सुरक्षा, सरकार देतंय एवढी रक्कम


नमस्कार शेतकरी बंधूंनो ,

नेहमीच अनेक योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेअंतर्गत पिकांना खराब हवामान पाऊस, दुष्काळ, वादळ,  पूर इत्यादी जोखमीपासून संरक्षण या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून दिले जाते.

fasal bhima yojana farmers


प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळं पिकान्चे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना माफक दरामध्ये  विमा संरक्षण देणं हा आहे. या योजनेतून आतापर्यंत सुमारे ३६  कोटी शेतकरी बांधवाना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 2016 पासून केंद्र सरकारने खरीप हंगाम पीएम पीक विमा ( PM PIK VIMA YOJANA ) योजना सुरू केली आहे. या योजनेंतुन अनेक शेतकऱ्यांचे जे पिकांचे झालेले नुकसान हे कव्हर केले जाते.

त्यामध्ये आता वन्य/ जंगली प्राण्यांकडून पिकांचं होणारं नुकसानही या विमा संरक्षणात समाविष्ट करण्यात आलेले आहे.ही योजना  बहुतांश राज्यांनी  स्वीकारली आहे. पीएम पीक विमा योजनेचा देशातील अनेक राज्यांतील अनेक  शेतकरी  या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी अर्ज भरावा लागतो. हा अर्ज तुम्ही ऑफलाइन किंवा  ऑनलाइन दोन्ही प्रकारे करू शकता . जर  शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर शेतकऱ्यांनी पीएम पीक विमा ( PM VIMA ) योजनेच्या  https://pmfby.gov.in  या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.


योजनेच्या अटी आणि शर्ती

विम्यासाठी शेतकर्‍यांनी पेरणीनंतर १०-१५  दिवसांच्या आत अर्ज केला पाहिजे, कारण पीक विम्यासाठी  त्यानंतरच कोणतेही पात्र मानले जाते. रेशनकार्ड किंवा आधारशी लिंक असलेला/केलेला शेतकऱ्याचा  बँक खाते क्रमांक, शेतकऱ्याचे ओळखपत्र, शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो, शेताचा गट/खाते  क्रमांक,   इ. कागदपत्रे जमा हि करावी लागतील.


सरकारकडून या पिकांचा पीक विमा उतरवला जाणार


प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत, 

● मूग पिकासाठी रु.16497 प्रति एकर

● कापूस पिकासाठी रु.३६२८२ प्रति एकर

● भात पिकासाठी रु.37484 प्रति एकर

● बाजरी पिकासाठी रु.१७६३९ प्रति एकर

● मका पिकासाठी रु.१८७४२ प्रति एकर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad