शेतकऱ्यांना या योजनेतून मिळेल ३ हजार रुपये प्रती महिना - पीएम किसान मानधन योजना 2022

 PM KISAN MANDHAN - पीएम किसान मानधन योजना 2022 मिळणार ३ हजार रुपये प्रती महिना - maha-agri

Pm-kisan-mandhan-yojana


पीएम किसान मानधन योजना 2022 शेतकऱ्यांना मिळणार ३ हजार रुपये प्रती महिना.

केंद्र शासन शेतकरी बांधवांसाठी  विविध नेहमीच योजना राबवीत असते. या योजने पैकीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना आहे. pm kisan mandhan yojana.

शेतकरी बांधवाना वयाच्या ६० वर्षानंतर ( pm kisan pm-kisan-mandhan ) पीएम किसान मानधन योजनेसाठी नियमित हफ्ते भरल्यास ३ हजार रुपये एवढे प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळते.

अगदी काही मिनिटामध्ये या योजनेसाठी तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. सीएससी सेंटर ( csc center ) आणि स्वतः ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो.


पीएम किसान मानधन योजना 2022

पहिली पध्द्त म्हणजे तुम्ही सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही पीएम किसान मानधन योजने साठी ऑनलाईन सादर करू शकता.

दुसरी पध्द्त म्हणजे शेतकरी बांधव स्वतः पाम किसान वेबसाइट वरून अर्ज करू शकतात.

टीप- अर्ज करण्यासाठी ची लिंक या लेखाच्या शेवटी दिली आहे.

दोन्ही प्रकारचे अर्ज हे ऑनलाईन केले जातात.


हि योजना अगोदर जाणून घेवूयात कि कोणासाठी आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे २ हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे.

या योजनाचा  १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरी हे लाभ घेऊ शकतात.

या योजनेमध्ये नियमितपणे हप्ते भरल्यास ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याला  ३ हजारची पेन्शन मिळते.

जर शेतकऱ्याचे वय १८ वर्षे असेल तर अश्या शेतकऱ्यांना ५५ रुपये हफ्ता तर ४० वर्षे वय असणाऱ्या शेतकऱ्यांना २०० रुपये हफ्ता हा भरावा लागतो.

या योजनेसाठी ५० टक्के हि रक्कम शेतकरी तर उर्वरित ५० टक्के रक्कम हि शासनाकडून भरली जाते.

पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकर्याला ऑनलाईन अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे ते पहा.

PM kisan mandhan yojana असा करा ऑनलाईन अर्ज.

https://maandhan.in/auth/login  हि वेबसाईट ओपन करा किंवा येथे क्लिक करा.

तूमंच्या समोरील स्क्रीन वर Self Enrollment या पर्यायावर क्लिक करा.

नंतर तुमच्या १० अंकी मोबाईल नंबर टाका व समोर परत ई-मेल id टाका व तुमच्या मोबाइलला वर एक OTP येईल तो OTP टाकून Proceed या बॅटन वर क्लिक करा.

त्या नंतर तुमच्या समोरील फॉर्म मधील माहिती सविस्तर अचूक भर व त्या नंतर अर्ज सबमिट करा.

PM किसान योजनेसाठी अर्ज हा सीएससी सेंटरवर देखील सादर केला जातो, बऱ्याच शेतकऱ्यांना या योजने बद्दल माहिती नाही, कृपया हा लेख तुमच्या जवळील शेतकऱ्याला पाठवा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad