Maha DBT Biyane Anudan Yojana 2022

बियाणे अनुदान योजना 2022 | Maha DBT Biyane Anudan Yojana 2022

Maha DBT Biyane Anudan Yojana 

बी-बियाणे Maha DBT  अनुदान योजना 2022:


शेतकरी बांधवांनी आपला चालू मोबाईल क्रमांक बियाणे घटकासाठी अर्ज करताना  ऑनलाइन अर्ज या मध्ये नोंदवावा लागेल .लाभार्थ्यांची निवड झाल्याचा तुमच्या संदेश मोबाईलवर प्राप्त होईल.

 खाली अजून वाचा.


बियाण्यास १००%  हे पिक प्रात्यक्षिका करिता अनुदान दिले जाईल.

कमाल ५०% मर्यादेपर्यंत हे प्रमाणित बियाण्याकरिता अनुदान राहील .

maharastra biyane anudan yojana

नमस्कार शेतकरी मित्रानो  , बियाणे, औषधे व खते हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून  वितरण अनुदान 2022 या योजनेच्या  संबंधित या लेखात आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामध्ये च बी - बियाणे अनुदानात हे समाविष्ट जिल्हे कोणते व त्या अनुदानावर पिके कोणती, त्यासाठी पात्रता काय, आणि हो आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील , अर्ज कुठे आणि  कसा करायचा इत्यादी  सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात आपण पाहणार आहोत.या योजनेअंतर्गत  जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की च वाचा.  पिकांसाठी पेरणीसाठी  राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औषध,बी - बियाणे, तसेच खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी या पोर्टल वरती सुरू आहेत. या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या.


महाडीबीटी Maha dbt  राज्य  शासनाच्या या  पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षका या अंतर्गत बी -बियाणे, औषधे आणि  खते इत्यादी घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आपण यामध्ये तुर, मुग,सोयाबीन,मका ,  उडीद, खरीप ज्वारी या बियाणे करीत तुम्ही  अर्ज हे करू शकता. या  योजनेमध्ये  अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची  निवड प्राप्त सर्व अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याकजी निवड हि करण्यात येईल. या लॉटरी पद्धतीद्वारे  ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला  अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळेल. अर्ज ज्या पिकाच्या बियाण्यासाठी केला आहे, उपलब्धतेनुसार त्याच  पिकाचे बियाणे व वाण  मिळेल. 

खाली सविस्तर वाचा….


▶कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शेतकऱ्याला लाभ देण्यात येईल.

▶बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .

▶कमाल ५०% मर्यादेपर्यंत  प्रमाणित बियाण्याकरिता  अनुदान दिले जाईल.


Mahadbt Biyane Anudan Yojana 


▶योजनेचे  नाव :-  Biyane Anudan Yojana

▶योजनेचे कार्यक्षेत्र:- संपुर्ण महाराष्ट्र राज्य

योजना जारी करणारा विभाग:- कृषी विभाग,महाराष्ट्र शासन

▶लाभ बियाणे :- यामध्ये आपण सोयाबीन,मका , तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी या बियाणे साठी अर्ज करू शकता


▶लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक

अर्ज फॉर्म ऑनलाईन


 पीकनिहाय केंद्र शासनाने  निवडलेले जिल्हे हे खालीलप्रमाणे असतील :

◇भरडधान्य राअसुअ  – औरंगाबाद, (मका) सांगली,  नाशिक,अहमदनगर,  जालना, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).

◇गहू राअसुअ  – बीड, सोलापूर, नागपूर (३ जिल्हे)

◇ पौष्टीक तृणधान्येराअसुअ  (न्युट्री सिरीयल) – बाजरी,ज्वारी,  रागी (एकूण २६ जिल्हे)

◇भात राअसुअ  – सातारा, नागपूर,नाशिक,भंडारा, गोंदिया,  पुणे,  चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)

राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे

१ ) बाजरी – जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे,  पुणे, औरंगाबाद, बीड, सातारा, सांगली, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)

२ )ज्वारी – नाशिक,जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, सातारा, नंदुरबार,  पुणे, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, जालना, परभणी, हिंगोली,कोल्हापूर, औरंगाबाद, बीड,  बुलडाणा, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)

३ ) ऊस – औरंगाबाद, जालना, बीड. (औरंगाबाद विभाग करीत ) 

४ ) कापूस –  बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ.(अमरावती विभाग करीत ) 

वर्धा,नागपूर,चंद्रपूर.

५) रागी – नाशिक, पुणे, सातारा,  ठाणे (पालघर सह), कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)

(लातूर विभाग) – लातूर,परभणी,हिंगोली.उस्मानाबाद,नांदेड, 

शेतकरी बांधवांनी  तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकारी  एकदा  बियाणे घटकासाठी  अर्ज करताना साहेबानंसोबत चर्चा करा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज हा सादर करा. Maharashtra Biyane Yojna २०२२


योजनेसाठी आवश्यक पात्रता काय:-

जर लाभार्थी शेतकरी डाळी,कापूस, तांदूळ, गहू, ऊस यां पिकाच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटका साठी अर्ज हा करीत असेल तर वरील जे जिल्हे दिलेले आहेत te त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील.

फक्त एकाच योजनेतून कोणत्याही बाबीसाठी  अनुदान देय आहे.

जर लाभार्थी हा अनुसूचित जमाती  किंवा अनुसूचित जाती  या जातिप्रवर्गाचा असेल तर त्यास जात प्रमाणपत्र अनिवार्य  आहे.

जर शेतकऱ्याला  गळीतधान्य हे पिके वा त्या मधून लाभ घ्यावयाचा असेल तर  त्यांच्या शेतात गळीतधान्य हे पिके असणे अनिवार्य  आहे.


व ज्या लाभार्त्याला वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यायचा असेल तर, त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे गरजेचे  आहे.

स्वतःचे नावे ७/१२ व ८/अ उतारा हा संबंधीत शेतक-याचे किंवा लाभार्थ्यांचे   असणे अनिवार्य असेल . “Biyane Anudan Yojana 2022 ”


लागणारे कागदपत्रे;-


● ८-अ प्रमाणपत्र

●७/१२ प्रमाणपत्र

● उपकरणांचे कोटेशन/खरेदी करण्याचे साधन /  (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)

● चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)

●अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती, लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

●पूर्वसंमती पत्र

● हमीपत्र



Biyane Anudan yojana 

अर्ज कोठे व कसा करायचा बियाणे अनुदान योजना :

संपूर्ण महाराष्ट्रभर  ही योजना  चालू आहे. अचूक अर्ज या योजनेसाठी चा  करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही स्वतः  तुमच्या गावातील अथवा जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज हा करू शकता.आणि  त्या अर्जाची पोचपावती घेऊन शकता. काही जर शंका असल्यास कृषी अधिकारी  तुमच्या तालुक्याच्या  साहेबानं सोबत त्याविषयी  चर्चा करा व त्यांच्या कडुनमिळालेल्या मार्गदर्शनाने तुम्ही  ऑनलाइन अर्ज करा.


आणि किंवा तुम्ही स्वत: जर ऑनलाइन क्षेत्रामाहे प्रगतशील अथवा हुशार असाल तर Maha- DBT येथे या पोर्टल वर  या योजनेबद्दल अधिक माहिती असेल  जाणून घ्या, आणि तास अर्ज करा. तसेच  या योजनेबद्दल जर तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या अथवा तुमच्या  तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे चर्चा करा व लवकरात लवकर अर्ज करन घ्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad