today astrology in marathi | आजचे राशी भविष्य

आजचे राशी भविष्य : -

today astrology in marathi

आजचे राशीभविष्य : 10 जून 2022आजचे राशीभविष्य : 10 जून 2022


Maha Agri l Astrology

1. मेष : मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही.

2.वृषभ : दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

3.मिथुन : एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

4.कर्क : अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात

5.सिंह : वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस

6.कन्या : आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा.

7.तूळ : संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभेल

8. वृश्चिक : छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल

9.धनू : तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकुलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या

10.मकर : आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.

11.कुंभ : जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. 

12. मीन : विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल.आजचे राशीभविष्य : 09 जुन 2022


Maha Agri l Astrology

1. मेष : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी अंमलात आणाव्यात.

2.वृषभ : उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे.

3.मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. 

4.कर्क : स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी.

5.सिंह : आवडत्या वस्तू खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल.

6.कन्या : कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. 

7.तूळ : नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. 

8.वृश्चिक : एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

9.धनू : आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

10.मकर : अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा.

11.कुंभ : कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल.

12.मीन : नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यताआजचे राशीभविष्य : 20 मे 2022


Maha Agri l Astrology

1. मेष : गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

2.वृषभ : मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेचे आवड जोपासता येईल. मानसिक ताणतणाव दूर सारावा.

3.मिथुन : स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. मनातील इच्छेला महत्त्व द्याल.

4.कर्क : दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल.

5.सिंह : उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कलाकारांचा नाव लौकिक वाढेल.

6.कन्या : धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

7.तूळ : आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभ संभवतो.

8.वृश्चिक : आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगावी.

9.धनू : आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नातेवाईकांची मदत मिळेल.

10.मकर : व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल. सहवासातून नवीन संबंध दृढ होतील.

11.कुंभ : कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये.

12.मीन : कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची आवड दर्शवालआजचे राशीभविष्य : 29 एप्रिल 2022


Maha Agri l Astrology

1. मेष : आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. 

2.वृषभ : कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. 

3.मिथुन : घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

4.कर्क : शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. 

5.सिंह : बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

6.कन्या : आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. 

7.तूळ : बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा.

8.वृश्चिक : गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील.

9.धनू : दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील

10.मकर : आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील.

11.कुंभ : आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. 

12.मीन : नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल.
आजचे राशीभविष्य : 28 एप्रिल 2022


Maha Agri l Astrology 

1. मेष : जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये

2.वृषभ : उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता

3.मिथुन : मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. 

4.कर्क : स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.

5.सिंह : घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. 

6.कन्या : कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

7.तूळ : अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

8.वृश्चिक : केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. 

9.धनू : आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल

10.मकर : आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील

11.कुंभ : कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. 

12.मीन : नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात.

आजचे राशीभविष्य : 27 एप्रिल 2022


Maha Agri l Astrology 

1. मेष : मनासारखे काम करता येईल. घराची स्वच्छता ठेवाल. वैचारिक बाजू सुधारेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

2.वृषभ : विरोधाला विरोध करू नका. भावंडांना मदत करता येईल. कंजूषपणा कराल. अचानक धनलाभ संभवतो.

3.मिथुन : कौटुंबिक क्षण आनंदात जातील. सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमजाला खतपाणी घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

4.कर्क : आपली उत्तम छाप पडेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान लाभेल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

5.सिंह : नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. नसती काळजी करत बसू नका. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद संभवतात.

6.कन्या : कर्तेपणाचा मान मिळवाल. मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. भावंडांचा विरोध जाणवेल. उत्तम गृहसौख्य लाभेल.

7.तूळ : तुमच्यातील परोपकारीपणा दिसून येईल. आशावादी विचार मांडाल. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पहाल. घरात तुमचे प्रभुत्व राहील

8.वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. मदतीचे समाधान कमवाल. कमतरता भरून निघायला मदत होईल

9.धनू : अचानक धनलाभाची शक्यता. रेस,जुगार यातून लाभ संभवतो. मनाची चंचलता लक्षात घ्यावी. सामाजिक वादात लक्ष घालू नये. 

10.मकर : पारमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. उत्तम भागीदार मिळेल.

11.कुंभ : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. जवळचे नातेवाईक भेटतील. 

12.मीन: वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. विशेष अधिकार हातात येतील. घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल.

आजचे राशीभविष्य : 13 एप्रिल 2022


1 तासाभरापूर्वी राशिभविष्य

 Maha-agr.in| Astrology


1. मेष : कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल.हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.


2. वृषभ : क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा.


कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. 

3. मिथुन : तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा


4. कर्क : कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.


5. सिंह : अडचणीवर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. 6.कन्या : वडीलधाऱ्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावेलागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.

 7. तूळ : क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.


8. वृश्चिक : जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.


9. धनू : हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवूका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.

 10. मकर : सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.


11. कुंभ : जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य रिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात. 

12. मीन : जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे.
आजचे राशीभविष्य : 11 एप्रिल 2022


Maha-agri.in l Astrology

1. मेष : कामात चांगले बदल घडून येतील. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.

2.वृषभ : जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. फसवणुकीपासून सावध रहा. लबाड लोकांपासून दूर राहावे.

3.मिथुन : कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल.

4.कर्क : नवीन मित्र जोडाल. कामाची धांदल उडेल. घरातील स्त्रियांची मदत होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

5.सिंह : तुमच्या कलेचे सादरीकरण करता येईल. उष्णतेचा त्रास जाणवेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.

6.कन्या : गुरुकृपेचा लाभ होईल. दिवस काहीसा आरामात घालवाल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.

7.तूळ : गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल. घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत.

8.वृश्चिक : अनाठायी खर्च होऊ शकतो. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. सहकार्‍याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

9.धनू : बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नसती काळजी करत बसू नका.

10.मकर : डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.

11.कुंभ : रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल. जवळचे मित्र भेटतील. शेतीच्या कामातून लाभ मिळेल.

12.मीन : कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. कष्टाचे योग्य चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात

आजचे राशीभविष्य : 10 एप्रिल 2022


Maha Agri l Astrology

1. मेष : घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.

2. वृषभ : जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.

3. मिथुन : कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

4.कर्क : सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.

5.सिंह : भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.

6. कन्या : जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

7. तूळ : कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई -घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे

8. वृश्चिक : कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

9. धनू : सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.

10. मकर : पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.

11. कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.

12. मीन : कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.


आजचे राशीभविष्य: 7 एप्रिल 2022| राशिभविष्य


Maha-agri | Astrology


1. मेष: उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात हिरीरीने भाग घ्याल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल 2. वृषभ : कपडे-लत्ते खरेदी कराल. महिला नटण्या मुरडण्याची हौस भागवतील.

चार चौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल. 

3. मिथुन : काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील.


4. कर्क : जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल.


वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. 5. सिंह: सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल.


आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत.


6. कन्या : विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामात


प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.


7. तूळ : जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.


8. वृश्चिक : काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य


बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.


9. धनू : खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो


मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी.


10. मकर : करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. रेस जुगारातून धनलाभ संभवतो. संभाषणाची आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.


11. कुंभ: मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत.


हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल. 12.मीन : आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल.आजचे राशीभविष्य : 6 एप्रिल 2022

राशिभविष्य


Maha Agri | Astrology


1. मेष: कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे.प्रमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.


2. वृषभ : भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मनापासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.


3. मिथुन : व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.


4. कर्क : सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.


 5. सिंह : औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची मने जिंकून घ्याल. चैनीच्या

वस्तू खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.


6. कन्या : व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन

विषयात रुची दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल.


7. तूळ : जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्समधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.


8. वृश्चिक : तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.


9. धनू: योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल.

ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या.


10. मकर: रेस जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. 

11. कुंभ : जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न


राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील. 

12. मीन : हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली


कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.


maha-agri | Astrology

 आजचे राशीभविष्य: 5 एप्रिल 2022


 राशिभविष्य

Maha-agri | Astrology

1. मेष : तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक

व्यवहार सावधगिरीने करावेत. तुमच्यातील उद्योगशीलता वाढेल.

2. वृषभ : अवाजवी कामे अंगावर घेऊ नयेत. मेहनतीला मागेपुढे पाहू नका. उधार

उसनवारीचे व्यवहार करू नयेत. खर्च आटोक्यात ठेवावा.

3. मिथुन : पत्नीच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल. नियम

बाह्य कामे करू नका. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. 4. कर्क : घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मित्र परिवारात वाढ होईल. मौल्यवान वस्तु लाभतील.

5.सिंह : बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. दान धर्माचे पुण्य पदरी पडेल. स्पर्धकांवर मात करता येईल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.

6.कन्या : पित्त प्रकृतीत वाढ संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. इतरांच्या

आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.

7. तूळ : स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल.

मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी विचार विनिमय करावा.

8. वृश्चिक : कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. स्वभावात काहीसा हटवादीपणा येईल. नवीन आव्हान पेलाल.

9. धनू : व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

10. मकर: फार उतावीळपणा करू नका. उष्णतेचे विकार संभवतात. कामातील उत्साह वाढीस लागेल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल.

11. कुंभ: काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. हातापायांना किरकोळ इजा संभवते.

12. मीन : जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मित्रांची नाराजी दूर करावी. तुमच्या

शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.आजचे राशीभविष्य : 4 एप्रिल 2022राशिभविष्य


maha-agri| Astrology


1. मेष : सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान


वस्तू जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल.


2. वृषभ: साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचं योग


येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका.


3. मिथुन : मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा


4. कर्क : नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन


सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. 5. सिंह: तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल.


चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. 6. कन्या : योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मनापासून मदतकराल. मनात नवीन कल्पना रुजतील.


7. तूळ : लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास


जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील.


8. वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल.


9. धनू : मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याचा भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. जुगाराची आवड जोपासाल.


10. मकर: कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.


11. कुंभ : वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिंमत वाढीस लागेल.


12. मीन : अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad