Online ferfar and satbara utara download

 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे मोबाईलवर असे पहा -


➥ तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कोणत्याही ब्राउजर मध्ये https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ हे वेबसाईट ओपन करावे लागणार.

➥ त्यांनतर या वेबसाईटवर तुम्ही जर  पहिल्यांदाच  आला असाल तर 'New User Registration' या पर्यावर वर क्लिक करा. (satbara online maharashtra)

➥ त्यांनतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल. 

                                    

➥ त्या फॉर्म मध्ये  तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.  

    जसे कि - नाव, मधले नाव,  मोबाईल क्रमांक,आडनाव, राष्ट्रीयत्व, ईमेल आयडी व जन्मतारीख अशी  काही 

     माहिती भरावी लागणार आहे. (satbara online maharashtra)

➥ हि माहिती भरल्यानंतर तुम्हाला पत्ता संबधीची माहिती द्यायची आहे. 

    जसे कि -  घर क्रमांक,गावयाचे नाव , जिल्हा ,  पिनकोड,व राज्य अशी माहिती भरायची आहे.

➥ त्या माहिती नंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवावा लागेल . 

➥ तुमचा लॉगिन आयडी बनविल्या नंतर तुम्हाला समोर वापरकर्ता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे असा 

    मॅसेज स्क्रीनवर येईल. 

     (satbara online maharashtra)

   आता तुम्हाला 

➥ लॉगिन ईद नोंदणी झाल्या  नंतर तुम्हाला लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.

➥ लॉगिन झाले तर आता तुमचे Registration झालेले आहे. 

 (satbara online maharashtra)

  आता आपण सातबारा, फेरफार व खाते उतारे हे  कसे पाहायचा ते आपण बघूया . 


➥ आता तुमचा जुना फेरफार व उतारा पाहण्यासाठी जिल्ह्याचे नाव व  तालुका त्यानन्तर  गावाचे नाव व 

    अभिलेखाचा प्रकार निवडावा लागणार आहे . 

➥ तुम्ही  फेरफार उतारा काढण्यासाठी फेरफार उतारा हा पर्याय निवडला किंवा जर तुम्हाला सातबारा किंवा 

   आठ अ उतारा हवा असेल तर हा पर्याय निवडा.

➥ यानंतर तुमचा पुढे गट क्रमांक टाकून सर्च बटनावर क्लिक करुन सर्च करा .

➥ सर्च झाल्यावर  तुमच्या समोर एक नवीन पेज (satbara online maharashtra) ओपन होईल. 

➥ तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती या  पेजवर दिसेल.

➥ त्यांनतर तुम्हाला तिथे फेरफारचं वर्ष आणि क्रमांक दिलेला असतो. तुम्ही त्या  पर्यावर क्लिक करून संबंधित 

   कोणत्याही वर्षांचा फेरफार किंवा उतारा बघू शकता.

 (satbara online maharashtra)

   तर अशाप्रकारे ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर सातबारा ,फेरफार   व खाते उतारे हे पाहू शकता. 

     हि माहिती पुढे अवश्य शेअर करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad